मतदारसंघातील शेतपांदण रस्त्यांचा प्रश्न सुटणार

आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी घेतला आढावा

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,
Yavatmal constituency, यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील शेतकèयांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्यात येत आहे. या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत यवतमाळ तहसील कार्यालय येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. मतदारसंघातील एकही शेतकरी रस्त्याविना वंचित राहणार नाही. प्रत्येक शेतापर्यंत हक्काचा रस्ता पोहोचेल, अशी ग्वाही आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यावेळी दिली.
 

Yavatmal constituency, farm roads, Balasaheb Mangulkar, 
या बैठकीला तहसीलदार योगेश देशमुख, गटविकास अधिकारी, वनविभाग, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून रस्ते मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले. बैठकीत यवतमाळ तालुक्यातील शेत पांदण रस्त्यांची सद्यस्थिती, मंजूर निधी, सुरू असलेली व प्रलंबित कामे तसेच येणाèया तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
 
शेतीमालाच्या वाहतुकीत Yavatmal constituency, येणारे अडथळे दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले. अनेक ठिकाणी वनविभाग किंवा महसूल विभागाशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे कामे रखडतात. अशा ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेऊन तातडीने प्रश्न मार्गी लावावेत व शेतकèयांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट निर्देश आमदार बाळासाहेब मांगुळकरांनी दिले आहेत. प्रलंबित कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.