सिंदी (रेल्वे),
यंदा सीसीआय तर्फे Cotton purchase कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे आणि वाढलेल्या जिनिंग संस्थांमुळे कापसाचे भाव वाढत आहेत. फेब्रुवारी महिन्यात पांढर्या सोन्याचे भाव ९ हजारांपेक्षा जास्त असण्याची शयता वर्तविली जात आहे. खरीप हंगामातील शिल्लक कापसाच्या भावात तेजी दिसत आहे. चालू आठवड्यात या तालुयात ८ हजार ५०० रुपये विंटलचा दर कापसाला मिळत आहे. अशीच घोडदौड सुरू राहण्याची चिन्ह आहे. पशु खाद्यात मोडणार्या सरकीचे भाव वाढत असल्यामुळे आणि जागतिक बाजारात भारतातील रुईला मागणी वाढत असल्यामुळे वायदे बाजारात सध्यातरी तेजी दिसून येत आहे.

Cotton purchase कापूस पट्ट्यात मागील चार वर्षात अनेक ग्रामीण भागात खाजगी जिनिंग आणि प्रेसिंग संस्था उभ्या झाल्या आहेत. त्या संस्थांकडे किमान ४३ हजार कच्च्या कापसांचा साठा असणे अनिवार्य आहे! अन्यथा, ते युनिट बंद पडण्याचा धोका संभवतो. पशु खाद्याकरिता सरकीची भरपूर मागणी असते, शिवाय सरकीच्या तेलास देखील भकम मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार कापूस खरेदी करणे जिनिंग संस्थाना गरजेचे ठरते. परिणामी, गत आठवड्यात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात कापसाला ८ हजार ८९० रुपये दर मिळाला होता. सोमवार १९ रोजी सेलूच्या उपबाजारपेठेत पांढर्या सोन्याला ८ हजार ५०० रुपये प्रतिविंटलचा दर मिळाला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर स्थिर असतात किंवा कमी केले जातात. पण, यंदा मागणी वाढण्याची शयता लक्षात घेता कापसाला ९ हजार रुपये भाव मिळण्याची दाट शयता दिसून येत आहे.