बॅडमिंटनची स्टार सायना नेहवाल निवृत्ती घेणार?

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Badminton star Saina Nehwal सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय सायना २०२३ मध्ये आपला शेवटचा सामना खेळली होती, त्यानंतर तिला गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळ सुरू ठेवता येत नव्हते. तिने निवृत्तीबद्दल एका पॉडकास्टमध्ये सांगितले की तिचे शरीर आता उच्च-तीव्रतेच्या प्रशिक्षणासाठी तयार नाही, त्यामुळे तिने स्वतःच्या अटींवर खेळ सुरू केला आणि त्या अटींवरच तो सोडला.
 
 
saina nehwal
सायना नेहवालची कारकीर्द भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक राहिली आहे. २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले आणि ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू बनली. ऑलिंपिक पदकासह, तिने भारतासाठी सात प्रमुख बॅडमिंटन स्पर्धांमध्ये एकूण १८ पदके जिंकली आहेत.
 
तिच्या यशाची यादी अत्यंत समृद्ध आहे. जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तिने दोन पदके जिंकली, ज्यात एक रौप्य आणि एक कांस्यपदक समाविष्ट आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने तीन कांस्यपदके जिंकली, तर उबर कपमध्ये दोन कांस्यपदक मिळवली. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदक आणि पाच एकूण पदके जिंकली, ज्यात एक रौप्य आणि एक कांस्यपदकही आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. सायना नेहवाल २०१५ मध्ये जगातील नंबर १ शटलर होती. तिला २००९ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, २०१० मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार आणि पद्मश्री मिळाला, तर २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तिच्या या ऐतिहासिक कारकिर्दीमुळे भारतीय बॅडमिंटनमध्ये नवीन उंची गाठली आहे.