देवळी,
Deoli Municipal Council देवळी नगरपरिषद येथे नगरपरिषद सभापतींची निवड प्रक्रिया आज मंगळवार २० रोजी झाली. बांधकाम सभापतिपदाची जबाबदारी उपाध्यक्ष राहुल चोपडा, आरोग्य सभापती विजय गोमासे, पाणीपुरवठा सभापती प्रेमेंद्र ढोक, शिक्षण सभापती शुभांगी कुर्जेकर, महिला व बालकल्याण सभापती मनिषा लोखंडे व उपसभापती ज्योती खाडे यांची निवड करण्यात आली. देवळी येथील जनसंपर्क कार्यालयात माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या बांधकाम सभापती उपाध्यक्ष राहुल चोपडा, आरोग्य सभापती विजय गोमासे, शिक्षण सभापती शुंभागी कुर्जेकर, पाणीपुरवठा सभापती प्रमेन्द्र ढोक, महिला व बालकल्याण सभापती मनिषा लोखंडे व उपसभापती ज्योती खाडे यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष शोभा तडस, गटनेता उमेश कामडी, माजी सभापती तथा नगरसेवक विलास जोशी, अनिल कारोटकर, शितल तर्हेकर, विभावरी बजाईत, संतोष भोयर, आदी नगरसेवक उपस्थित होते.

Deoli Municipal Council देवळी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, पाण्याची साठवण क्षमता वाढवणे व नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ते विशेष लक्ष देतील, स्वच्छता, आरोग्य सेवा, साथीचे आजार प्रतिबंध व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविेतील, महिलांचे सक्षमीकरण, बालकांचे संगोपन, पोषण आहार योजना तसेच सामाजिक कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सभापती व उपसभापती समन्वयाने कार्य करतील असे माजी खासदार रामदास तडस म्हणाले.