वरोडा,
देशातील ‘सीईटी फॉर कॅन्सर अँड रिसर्च ऑर्गनायझेशन’ दिल्ली ही संस्था कॅन्सर रुग्णांकरिता मागील कित्येक वर्षांपासून मदतीचे कार्य करीत आहे. ही संस्था Help for cancer patients कॅन्सर रुग्णांकरिता मदतीचे आवाहन करते. रविवारी वरोडा येथील रत्नमाला चौकात या संस्थेच्या रमाशंकर त्रिवेदी या प्रतिनिधीने चक्क सहा तास रस्त्याच्या मधोमध उभे राहून कॅन्सर रुग्णांकरिता मदत गोळा केली.
सीईटी फॉर कॅन्सर अँड रिचार्ज ऑर्गनायझेशन प्रतिनिधी म्हणून मध्य प्रदेशातील रमाशंकर त्रिवेदी मागील सहा वर्षांपासून काम करीत आहे. संपूर्ण भारतात ते भ्रमण करीत असतात. देणगीचा डब्बा जोपर्यंत पूर्णपणे भरत नाही, तोपर्यंत ते संस्थेच्या दिल्ली येथील कार्यालयात जात नाही. रस्त्यावर दोन्ही हातात फलक घेऊन उभे राहत कॅन्सर रुग्णांकरिता मदत मागण्याचे काम मागील सहा वर्षांपासून करीत असल्याचे रमाशंकर त्रिवेदी म्हणाले. कॅन्सर रुग्ण भारतातील कुठलाही असला तरी ही संस्था उपचाराकरिता मदत करीत असते.
रमाशंकर त्रिवेदी रविवारी वरोडा शहरातील रत्नमाला चौकात दोन्ही हातात फलक घेऊन सकाळी 8 वाजता उभे राहिले. त्यामुळे अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करीत फलक हातात घेऊन उभे राहण्याऐवजी खाली बसण्याचा सल्ला दिला. परंतु, ते सहा तास सतत उभेच होते. त्यांच्याजवळ देणगीकरिता डब्बा आणि पावती पुस्तक होते. विशेष म्हणजे, त्रिवेदी हे तोंडाने मदत मागत नाहीत, तर जवळ येऊन कोणी देणगी देणार्यास स्वतः पावती लिहायला सांगत होते. Help for cancer patients कॅन्सर हा आजार समूळ नष्ट व्हावा ही मनीषा त्यांनी यावेळी व्यक्त केली.