आज रंगणार भारत-न्यूझीलंड सामना

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
क्रिकेट सामन्यासाठी दाेन हजार पाेलिसांचा बंदाेबस्त
- वाहतुकीचे नियम माेडल्यास वाहन जप्त

अनिल कांबळे
नागपूर, 
India and New Zealand T20 Cricket भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना बुधवारी नागपूरच्या जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर खेळल्या जाणार असून यासाठी यंगीस्तानची उत्सूकता शिगेला पाेहचली आहे. इंदूर येथील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘यंग इंडिया’ सज्ज आहे. पराभवाने खचून न जाता विजय मिळवायचाच या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका संत्रा नगरीतील पहिल्या सामन्याने सुरू हाेत आहे. एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाचे शल्य पुसून काढण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ‘यंग इंडिया’ मैदानात उतरणार आहे.
 
 
criket
 
India and New Zealand T20 Cricket शहरात हाणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी जवळपास 2 हजार पाेलिस कर्मचारी बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. क्रिकेट सामन्यादरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर पाेलिसांचा भर आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील क्रिकेट सामन्याची उत्सूकता शिगेला पाेहचली असून क्रिकेटप्रेमींनी गेल्या दाेन दिवसांपासून शहरातील व्हिसीए स्टेडियमवर तिकिट मिळविण्यासाठी माेठी गर्दी केली हाेती. शहरातील वर्धाराेडवरील जवळपास सर्वच हाॅटेल क्रिकेट प्रेमींनी बुक केले असून शहरात युवांची गर्दी दिसत आहे. उद्या दुपारपासूनच वर्धा राेडवर क्रिकेट बघणाèयांची वर्दळ सुरु राहणार आहे. शहरातील गर्दी नियंत्रण करणे, वाहतूक व्यवस्था सांभाळणे यासाठी दाेन हजार पाेलिसांचा बंदाेबस्त जामठा स्टेडियमवर लावण्यात आला आहे.
 

क्रिकेट सट्टेबाजांची चांदी
शहरात क्रिकेट सट्टेबाजांचा माेठा ताा सट्टेबाजीसाठी सज्ज असून हा सट्टा काेट्यवधीच्या घरात राहणार आहे. शहरातील जरीपटका, नंदनवन, लकडगंज, अंबाझरी, गिट्टीखदान परिसरात अनेक बुकींनी बस्तान मांडले आहे. गेल्या दाेन वर्षांपूर्वी पाेलिस निरीक्षक किशाेर पर्वते यांनी थेट जामठा मैदानातून दाेन क्रिकेट बुकींना सापळा रचून अटक केली हाेती. त्यामुळे पाेलिसांना मैदानावरुनही क्रिकेट बुकींचे आव्हान आहे.

कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यासाठी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त लावण्यात आला आहे. वाहतूक पाेलिसांचा माेठा ताा वर्धा राेड ते जामठा स्टेडियमपर्यंत तैनात करण्यात आला आहे. वाहतूक काेंडी हाेऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहाेत.
 
-नवीनचंद्र रेड्डी (पाेलिस सहआयुक्त)