मॉस्को,
india-russia-relation अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला होता. या टॅरिफमागचे मुख्य कारण भारत रशियाकडून तेलाची खरेदी करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेच्या मते, रशियाकडून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग युक्रेनविरोधी युद्धात होत आहे. मात्र भारताने तरीही रशियाकडून तेलाची खरेदी सुरू ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांत भारताने रशियाकडून तेलाची खरेदी काही प्रमाणात कमी केली असून, यामागचे एक मुख्य कारण भारत आणि अमेरिकेमध्ये चालू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा देखील आहे.

अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारत-अमेरिका व्यापारावर ताण निर्माण झाला असून, भारताची अमेरिकेत होणारी निर्यात घटली आहे. मात्र, भारताने या दबावाचा परिणाम टाळत रशिया आणि चीनसोबतच्या आर्थिक जवळीक वाढवली आहे. भारताच्या रशिया व चीनकडून होणाऱ्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफने भारतावर अपेक्षित परिणाम न होण्याचे दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. india-russia-relation आता रशियाने भारताला दोन प्रवासी विमानांची ऑफर दिली आहे, सुपरजेट-100 आणि Il-114-300. ही दोन्ही विमानं रशियन तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली असून, भारताच्या विमान उद्योगाला चालना देऊ शकतात, असे रशियाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, सुपरजेट-100 विमानाच्या आतील बाजूस भारताच्या तिरंग्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे. हे भारतासाठी एक महत्त्वाचे संकेत आहेत की, अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशिया आणि चीनसोबतचा आपला आर्थिक व औद्योगिक संबंध अधिक बळकट केला आहे.