मुंबईकरांचा सांस्कृतिक वारसा हरपला; इराणी कॅफेला कायमचा टाळा

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
मुंबई,  
irani-cafes-closed महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही शहर केवळ आर्थिक केंद्र म्हणून नाही, तर तिच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठीही ओळखली जाते. ब्रिटीश काळातील छोटे बेट ते भारताची आर्थिक राजधानी अशी मुंबईची वाटचाल अनेक जुन्या वास्तूंनी भरलेली आहे. त्यातच एक ठिकाण म्हणजे ग्रँट रोड स्टेशनजवळील 112 वर्ष जुना ‘बी. मेरवान अँड कंपनी’ इराणी कॅफे, जिथे मावा केक, मसाला ऑम्लेट, बन मस्का आणि पाणी कमी चहा यांसारख्या पदार्थांमुळे मुंबईकरांच्या जिभेवर घर केले. मात्र आता हा कॅफे कायमचा बंद होत असल्याचे समोर आले आहे.
 
irani-cafes-closed
 
ग्रँट रोड (पूर्व) येथील या लोकप्रिय हॉटेलला कौटुंबिक वादामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाजावर ‘आम्ही बंद करत आहोत, तुमच्या सहकार्याबद्दल आभार’ अशी पाटी लावण्यात आली आहे. या पाटीमुळे या इराणी कॅफेच्या शुद्धप्रेमी ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. २०१४ मध्ये हा कॅफे काही काळासाठी तातडीच्या दुरुस्तीनंतर बंद झाला होता, मात्र नंतर पुन्हा सुरू झाला. या वेळी मात्र तो कायमचा बंद होत असल्याचे ठरले आहे. irani-cafes-closed गेल्या काही काळापासून येथे ‘सेल्फ सर्विस’ सुरू होती, जी इथल्या पारंपरिक ग्राहकांना फारशी आवडली नव्हती. फोर्टमधील ‘यझदानी’ नंतर आता ‘बी. मेरवान’ही बंद झाल्याने, मुंबईतील खऱ्या इराणी कॅफे आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणारी ठिकाणे आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उरली आहेत. मुंबईकरांसाठी हा सांस्कृतिक आणि खाद्यपरंपरेचा मोठा धक्का आहे.