पालघर नेमका महाराष्ट्राचा की गुजरातचा?

रस्त्यावरील अधिसूचनेत गुजराती भाषेचा समावेश

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
पालघर,
Palghar belong to Maharashtra or Gujarat महाराष्ट्रातील नवा जिल्हा पालघर सध्या एका अनोख्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालघर हा जिल्हा नेमका महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये, असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मनात उभा राहिला आहे. या वादाचे मूळ कारण ठरली आहे सरकारचीच एक अधिसूचना. पालघर जिल्हा प्रशासनाने 19 आणि 20 जानेवारी रोजी मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (एनएच–48) मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदीची अधिसूचना काढली होती. मात्र या अधिसूचनेत मराठी व हिंदीबरोबर गुजराती भाषेचा समावेश करण्यात आल्याने अनेक नागरिक संतापले आहेत आणि राज्य प्रशासनावर टीका सुरु झाली आहे.
 

Palghar belong to Maharashtra or Gujarat 
जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर लावलेल्या फलकांवर देखील गुजरातीचा वापर केल्यामुळे विरोधकांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. लोकांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी. मनसेच्या नेत्यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी, असा संदेश दिला. संजय राऊतांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, हे गंभीर आहे. यावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र बसून विचार करणे आवश्यक आहे. पालघर हा जिल्हा महाराष्ट्राचा आहे, पण बुलेट ट्रेन आणि बंदर विस्ताराच्या निमित्ताने हा दुसऱ्या राज्याशी जोडला गेला आहे. पालघरचा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, असा तिव्र इशारा त्यांनी दिला.
 
गुजराती भाषेवरून निर्माण झालेल्या या वादाच्या फटका बिहार भवन प्रकल्पाच्या विरोधात सुद्धा अनुभवला जात आहे. मुंबईत 30 मजली ‘बिहार भवन’ उभारण्यास बिहार सरकारने प्रशासनिक मान्यता दिली आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला, परंतु मनसे आणि स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी या निर्णयावर विरोध व्यक्त करत म्हटले आहे की, एवढे पैसे खर्च करून आपल्या राज्यात चांगली रुग्णालये उभी करावी, लोक बाहेर येऊन उपचारासाठी येऊ नये. पालघर जिल्ह्यातील या विवादामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, आणि प्रशासनाला स्थानिक भाषिक व नागरी भावनांचा समतोल राखत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे दिसून येते.