पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजपासून नितीन नबीन आहेत माझे नवे बॉस”

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,   
pm-modi-said-nitin-nabin-is-my-boss पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांच्या निवडीच्या कार्यक्रमात भाषण करताना पक्षाची कार्यसंस्कृती, संघटनात्मक परंपरा आणि आगामी काळातील दिशा यावर सविस्तर भाष्य केले. भाजपमध्ये पदांपेक्षा कार्यकर्त्याला अधिक महत्त्व दिले जाते, हीच पक्षाची खरी ओळख असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
pm-modi-said-nitin-nabin-is-my-boss
 
“देशाचे पंतप्रधान होणं, तिसऱ्यांदा ही जबाबदारी मिळणं, वयाच्या पन्नाशीत मुख्यमंत्री होणं किंवा तब्बल २५ वर्षे सरकारचे नेतृत्व करणं या गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान म्हणजे मी भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे,” नितीन नबीन हे आता संपूर्ण संघटनेचे अध्यक्ष असून तेच माझे बॉस आहे असे मोदी म्हणाले.  नितीन नबीन यांच्यावर केवळ भाजपाची जबाबदारी नाही, तर एनडीएतील सर्व सहकारी पक्षांमध्ये समन्वय राखण्याचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे, असे मोदी म्हणाले. त्यांच्या साधेपणा, सहज वागणूक आणि सर्वांना आपलंसं करून घेण्याच्या स्वभावाचा उल्लेख करताना मोदींनी सांगितले की, युवक मोर्चा, विविध राज्यांची जबाबदारी किंवा बिहार सरकारमधील कामाचा अनुभव, प्रत्येक पातळीवर नितीन नबीन यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. २१व्या शतकातील पुढील २५ वर्षे भारतासाठी निर्णायक असतील आणि याच काळात ‘विकसित भारत’ साकार होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. pm-modi-said-nitin-nabin-is-my-boss या महत्त्वाच्या टप्प्यावर नितीन नबीन भाजपचा वारसा पुढे नेतील, असेही ते म्हणाले. मिलेनियल पिढीचे प्रतिनिधी असलेल्या नितीन नबीन यांनी समाजातील बदल, तंत्रज्ञानातील क्रांती जवळून पाहिली असून त्यांच्याकडे ऊर्जा, अनुभव आणि संघटन कौशल्य असल्याचे मोदींनी नमूद केले.
सौजन्य : सोशल मीडिया  
भाषणाच्या शेवटी मोदींनी जनसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत, लाखो कार्यकर्त्यांच्या त्यागाला आणि बलिदानाला वंदन केले. “जनसंघाच्या वटवृक्षातूनच भाजपचा जन्म झाला आहे. pm-modi-said-nitin-nabin-is-my-boss आज भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. हे भारतातील मजबूत लोकशाहीचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. भाजपा हा केवळ पक्ष नाही, तर एक संस्कार आणि कुटुंब आहे, असे सांगत मोदींनी स्पष्ट केले की, भाजपामध्ये पदे बदलतात, पण मूल्ये आणि दिशा कधीही बदलत नाहीत. नेतृत्व बदलले तरी पक्षाचा विचार आणि वाटचाल कायम समान राहते, हेच भाजपचे बळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.