नागपूर,
R.S. Mundle College धरमपेठ शिक्षण संस्था संचालित आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित ‘नवरंग’ सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हासऔरंगाबादकर तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्या प्रा. विशाखा जोशी होत्या. उपप्राचार्या डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व विशद केले.
महोत्सवाअंतर्गत रांगोळी, मेहंदी, एकल गीत व समूह नृत्य अशा चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध परीक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या.R.S. Mundle Collegeकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिथिला वखरे यांनी मांडले, तर उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन व आभार डॉ. दीपलक्ष्मी भट यांनी मानले. ‘नवरंग’मुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळून महाविद्यालयीन वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
सौजन्य: डॉ. दीपलक्ष्मी भट,संपर्क मित्र