अरे देवा...ठाकरे गटाचा नगरसेवक चक्क जंगलात लपला

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Thackeray's corporator is hiding in forest कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. 122 सदस्य असलेल्या महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 53 आणि भाजपाचे 50 नगरसेवक निवडून आले असून, भाजप आणि शिंदे गटाची युती होती. मात्र, शिंदे गट आता आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात असून, ठाकरे गटाचे नगरसेवक टार्गेट करण्यात येत आहेत.

hiding in forest 
 
फोडाफोडीच्या या राजकारणाला कंटाळून ठाकरे गटाचा नवनिर्वाचित नगरसेवक नितीन खंबायत चक्क मलंगगड भागातील जंगलात लपून बसला. खंबायत यांना कल्याण पूर्वेतून ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती आणि त्यांनी निवडणूक जिंकली, परंतु शिंदे गटाकडून त्यांना आपल्या गटात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यांना मोठ्या ऑफरही देण्यात आल्या, पण त्यांनी पक्षाशी गद्दारी करण्यापेक्षा काही काळ संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याचे ठरवले.
 
 
निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी, ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे आणि ॲड. किर्ती ढोणे यांनी शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे गटात अस्वस्थता पसरली, तर मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्येही नाराजी व्यक्त होऊ लागली. या हालचालींमुळे महापालिकेत राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे. जंगलात लपून बसलेल्या नितीन खंबायताच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत फोडाफोडीच्या राजकारणाची खरी झळक दिसली. दबावामुळे लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे सुरक्षिततेसाठी काही काळ संपर्क क्षेत्राबाहेर जावे लागणे हा पक्षांतर किंवा दबावाच्या राजकारणाचा प्रत्यय ठरतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.