भिडी-तळणी रस्त्याची आ. बकाने यांनी केली पाहणी

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
घोडी नाल्यामुळे खचलेल्या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी सूचना
 
देवळी, 
देवळी—पुलगाव विधानसभा मतदार संघातील Bhidi-Talni Road भिडी ते तळणी या मार्गाची आ. राजेश बकाने यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावर घोडी नाल्याच्या प्रवाहामुळे वळणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खच निर्माण होत असून यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
pahani
 
पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याचा वेग वाढल्याने रस्त्याखालची माती वाहून जात असून रस्ता खचण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत आ. बकाने यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक तांत्रिक उपाय, संरक्षण भिंत तसेच भविष्यात अशा प्रकारची धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्या तसेच कामात कोणतीही दिरंगाई चालणार नाही, असे आ. बकाने यांनी जबावून सांगितले.
 
 
ग्रामस्थांनी रस्त्याच्या खराब स्थितीमुळे येणार्‍या अडचणी आमदारांसमोर मांडल्या, त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास आमदार बकाने यांनी यावेळी दिला. Bhidi-Talni Road  भिडी—तळणी रस्ता हा परिसरातील शेतकरी, विद्यार्थी व दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने रस्त्याची सुरक्षितता आणि टिकाऊ दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राजेंद्र रोकडे, अजय झाडे, सुनील चोरे, संजय बिजवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश सोनटक्के तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.