मानोरा,
तालुक्यातील धानोरा बु. येथे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत Auditorium on the animal reserve जनावरांसाठी राखीव असलेल्या जागेवर सभागृहाचे बांधकाम सुरू केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या कथित बेकायदेशीर बांधकामाला विरोध करत विजय राठोड यांच्यासह शिवसेना (शिंदेगट) पदाधिकार्यांनी पंचायत समिती मानोरा येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन देत जाब विचारला आहे.

धानोरा बु. येथे जिल्हा परिषद वाशीम यांच्या अनुदानातून Auditorium on the animal reserve सभागृहाचे बांधकाम सुरू असून, ज्या जागेवर हे काम होत आहे ती जागा गावातील जनावरांना उभे करण्यासाठी आरक्षित असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीही या जागेवर कोणतेही बांधकाम करू नये, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सचिव व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने या हरकतीकडे दुर्लक्ष करत बांधकाम सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बांधकामामुळे भविष्यात जनावरांसाठी जागेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असून ग्रामस्थांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर सभागृहाचे बांधकाम कोणत्या ग्रामसभेच्या ठरावावर, कोणत्या शासकीय आदेशावर आणि कोणत्या परवानगीनुसार सुरू करण्यात आले आहे. याबाबतच्या सर्व कागदपत्रांच्या प्रती तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठोस मागणी विजय राठोड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख डॉ. दिपक करसडे, उपतालुका प्रमुख विनोद राठोड, ज्ञानेश्वर राठोड, दत्ता सावत, अशोक जाधव, दत्ता नेमाने, विजय राठोड, देविदास राठोड, एकनाथ कोल्हे, अतुल मोढे यांची उपस्थिती होती.