धनुष्यबाण चिन्ह एकतर उद्धव गटाला जाणार किंवा गोठवणार?

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Bow and arrow symbol सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर पडला आहे. आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार होती, मात्र कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली असून आता ती २३ जानेवारी रोजी होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात राजकीय वातावरण गोंधळलेले असताना ही सुनावणी महत्त्वाची ठरली होती. सुनावणी पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वकिल असीम सरोदे यांनी सांगितले की, पक्ष फोडण्याची प्रक्रिया भविष्यात भाजपसाठीही धोकादायक ठरू शकते, त्यामुळे या प्रकरणावर स्पष्टता येणे गरजेचे आहे. धनुष्यबाण चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिले जाऊ शकते किंवा गोठवले जाऊ शकते, पण आतापर्यंत या चिन्हावर निवडून आलेल्या खासदार, आमदार किंवा नगरसेवकांवर निकालाचा काही परिणाम होणार नाही.
 
 
 
arrow symbol shivsena
मागील सुनावणीत न्यायालयाने २१ जानेवारीला सकाळी ११ वाजता अंतिम सुनावणी होईल असे ठरवले होते. या दिवशी दोन्ही पक्षांच्या वकिलांना सुमारे पाच तासांचा वेळ देण्यात येणार होता. मात्र सॉलिसिटर जनरलच्या इतर प्रकरणात उपस्थित राहण्याच्या गरजेमुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. शिवसेना नाव व चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी आता २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होईल. वकिल असीम सरोदेंनी सांगितले की आजची सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे कारण दुपारी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्यासोबत विशेष न्यायालयाची कामे पार पाडली जातील. यामुळे आजची सुनावणी घेण्याची अपेक्षा करता येणार नाही, पण पुढील शुक्रवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.