आर्णी,
आर्णी पोलिस ठाणे हद्दीत Crime एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सर्व पुराव्याअंती न्यायालयाने 24 वर्षीय आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आर्णी तालुक्यातील कोपरा येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला 14 मे 2021 रोजी आरोपी श्याम माणिक ढोले (वय 24) याने लग्नाचे अमीष दाखवून पळवून नेले होते. तसेच तिला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बनवाडी येथे भाड्याची खोली घेऊन राहत असताना वारंवार शारीरिक अत्याचार केले.
या Crime गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार यांनी केला. पीडित मुलगी व आरोपीचा शोध घेऊन आरोपीविरुद्ध भादंवि 363, 366, 376 (2), 376 (ज) (न) सहकलम 4,6 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय दारव्हा येथे 12 जुलै 2021 रोजी सादर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायधीश संजीव नरवाडे यांनी या प्रकरणात 8 साक्षीदार तपासले. त्यात पीडिता व इतर साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून मंगळवार, 20 जानेवारी रोजी दिलेल्या निकालात श्याम ढोले याला भादंवि कलम 363 मध्ये 3 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, कलम 366 मध्ये 5 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, भादंवि कलम 376 (2) मध्ये 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंड, कलम 376 मध्ये 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंड तसेच पोक्सो कलम 4 मध्ये 20 वर्षे शिक्षा व 25 हजार रुपये दंड, कलम 6 मध्ये 20 वर्षे शिक्षा व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
Crime या निकालात दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश देण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे अॅड. अंकुश देशमुख यांनी बाजू मांडली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार, लेखनिक विशाल गावंडे यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून गजानन भगत यांनी काम पाहिले.