अमृत भारत स्टेशन उपक्रमांतर्गत स्थानकांची तपासणी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी केली पाहणी

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
नागपूर,
amrut bharat station अमृत भारत स्टेशन उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील विविध स्थानकांची तपासणी करणत आली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी पाहणी दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-कामठी-कन्हान स्थानकांना भेट देण्यात आली. मंगळवारी खासदारांमधील बैठकीनंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आढावा घेतला. अमृत भारत स्टेशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली.
 

amruta bharat stetion 
 
 
तपासणी दरम्यान, महाव्यवस्थापकांनी ट्रॅक, पॉइंट्स आणि क्रॉसिंग्ज, ओव्हरहेड उपकरणे, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टम, लेव्हल क्रॉसिंग गेट्स रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षा उपायांची स्थिती सखोलपणे पाहणी केली. प्रमुख स्थानकांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, प्लॅटफॉर्म निवारा, सूचना फलक, घोषणा प्रणाली, तिकीट आणि प्रतीक्षा यासारख्या विद्यमान प्रवाशांच्या सुविधांची स्थिती देखील पाहणी करण्यात आली.amrut bharat station मालवाहतूक शेडमधील व्यवस्थेची देखील करण्यात आली.