अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठ्यावर कायम तोडगा काढा

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
नगरसेवकांची सामूहिक मागणी
 
सिंदीरेल्वे, 
शहराच्या अनेक प्रभागात Irregular and unclean water supply अनियमित व अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यावर कायमचा तोडगा काढण्यात यावा यासाठी १५ दिवसात विशेष बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी शहर विकास आघाडीने केली आहे. सिंदी शहर विकास आघाडीचे संयोजक व नगरसेवक अजय कलोडे आणि इतर नगरसेवक यांनी तसे लेखी पत्र नगराध्यक्ष राणी कलोडे आणि खा. अमर काळे यांच्यासह जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना दिले.
 
 
water
 
Irregular and unclean water supply येथील पालिकेच्या कार्यक्षेत्रात दहा प्रभाग आहेत. शहराची सरासरी लोकसंख्या १५ हजार आहे. सन १९७४ पासून नळयोजनेद्वारे प्रारंभी जनतेला रोज पाणी पुरवठा केल्या जात होता. उन्हाळ्यात थेट बोरधरणातून पाणी सोडल्या जात असे. दरम्यान. ना. गडकरी यांच्या सौजन्याने शहरापासून १० कि. मी. अंतरावरुन वाकसूर शिवारातून पाणी आणल्या गेले. परंतु, सर्व सोयी तसेच जल शुद्धिकरण संयत्र उपलब्ध असताना जनतेला नियमित व शुद्ध पाणी मिळत नाही. ही ज्वलंत समस्या संपुष्टात यावी, असे सत्ताधारी गटाला पण वाटते. परंतु, शहराच्या पाणी पुरवठा समितीचे सभापतीपद नुकतेच प्राप्त झाले आहे. त्या समस्येची उकल करण्यासाठी अवकाश मिळायला हवा. थोडे सबुरीने घेतल्यास उचित उपाययोजना करता येईल, असे उपाध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती शेख अकील यांनी दिली.