मुंबई महापालिकेत गटनेतेपदी किशोरी पेडणेकर

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Kishori Pednekar as group leader शिवसेना ठाकरेंच्या गटाने माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी निवडले आहे. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, किशोरी पेडणेकर वॉर्ड क्रमांक 199 मधून महापालिकेच्या निवडणुकीत विजयी ठरल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे रुपल कुसळे यांना पराभूत केले. गटनेतेपदी निवडीसाठी महापालिकेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य आणि श्रद्धा जाधव यांची नावे चर्चेत होती. बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांना गटनेतेपदी निवडण्यात आले.
 

किशोरी पेडणेकर 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत २५ वर्षांहून अधिक काळ ठाकरेंच्या गटाचे एकहाती वर्चस्व होते. मात्र 2026 च्या निवडणुकीत भाजप-युतीने ८९ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता मिळवली. ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या. काँग्रेस २४, मनसे ६, एमआयएम ८, राष्ट्रवादी अजित पवार गट ३, राष्ट्रवादी शरद पवार गट १, समाजवादी पक्ष २ जागा जिंकल्या. सर्व २९ महानगरपालिकांमध्ये महापौरपदासाठी आरक्षणाची घोषणा २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. या निर्णयानंतर कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेत येईल हे निश्चित होईल. नगरविकास विभागातून महापौरपदाच्या आरक्षणाची माहिती मंत्रालयात जाहीर केली जाईल.