तरुणांसाठी सुवर्ण संधी! तब्बल 15000 हजार रिक्त पदे

पुणे शहरातून भरभरून अर्ज

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
पुणे,
Maharashtra Police राज्यभरात सुरु असलेल्या महापालिका निवडणुकीच्या आचार संहितेचा कालावधी संपताच, राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया गतीमान झाली आहे. या भरतीत तब्बल 15000 रिक्त पदांसाठी विविध चाचण्यांची तयारी सुरू आहे. घटकनिहाय अर्ज छाननीचे काम सुरु असून, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मैदानात उतरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. मार्च अखेरपर्यंत या भरतीची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
 

Maharashtra Police
या भरती प्रक्रियेमध्ये Maharashtra Police  अनेक उमेदवारांच्या मनात विविध शंका आणि चिंता आहेत, विशेषतः राज्यात होणाऱ्या इतर निवडणुकींचा या भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का, याबाबत विचारले जात आहे. याउप्पर, नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली नसली तरी इतर जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे काही विलंब होईल का, याबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलांसह अधिसूचना जारी केली असून, या जागांवर होणाऱ्या भरतीसाठी असलेल्या तयारीचे स्पष्ट मार्गदर्शन उमेदवारांना दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील पोलिस दल व कारागृह विभागातील शिपाई पदांसाठी असलेल्या जागांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. विशेषतः कारागृह आणि एसआरपीएफ शिपाई संवर्गाला उमेदवारांमध्ये अधिक पसंती दिसत आहे.
मुंबई, नवी मुंबई, Maharashtra Police  मीरा-भाईंदर, पुणे या शहरांमध्ये या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. कारागृह आणि एसआरपीएफ शिपाई संवर्गातील अनेक उमेदवार यावर्षी इन्जिनीअरिंग, आयटी क्षेत्रातील पदवीधर, तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवीधारक स्पर्धेत उतरले आहेत. शारीरिक चाचणी नंतर, लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल. उमेदवारांची निवड 100 गुणांच्या लेखी परीक्षेवर आधारित असेल.नाशिक ग्रामीण पोलिस दलात 210 शिपाई, 52 चालक आणि कारागृह विभागात 118 शिपाई अशी एकूण380 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अखेरची संधी दिली आहे. या भरतीमुळे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी संख्या वाढेल, तसेच सिंहस्थ कुम्भमेळ्यात ग्रामीण पोलिसांची संख्या वाढल्याने पोलिसांचा बळ वाढणार आहे.
 
 
 
2012 मध्ये नाशिक ग्रामीण Maharashtra Police  पोलिस दलात 150 शिपाई व 2024 मध्ये 32 शिपाई पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. सध्या त्यातील कर्मचारी पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. आता होणाऱ्या भरतीमुळे नवीन कर्मचारी उपलब्ध होऊन सिंहस्थाच्या सुरक्षेची तयारी मजबूत होईल.नाशिक शहरातील रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया घोषित झालेली नाही. मात्र, ग्रामीण भागातील पोलिसांच्या भरतीमुळे सिंहस्थासाठी अधिक कर्मचाऱ्यांची उपलब्धता होईल, अशी अपेक्षा आहे.राज्यभरातील उमेदवारांमध्ये या भरती प्रक्रियेसाठी मोठी उत्सुकता दिसत असून, यामुळे आगामी काही महिन्यांत पोलिस दल आणि कारागृह विभागाच्या कार्यक्षमता मध्ये सुधारणा होईल, असे सांगितले जात आहे.