कृषी व औद्योगिक क्रांतीच्या प्रनेत्यांनी शिक्षण घेतलेली इमारत टाकत आहे कात

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
 
मानोरा, 
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या विठोली येथे राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळून राज्याला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला त्या कै. वसंतराव नाईक यांनी ज्या Primary school building शाळा इमारतीमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविले ती भग्नावस्थेत पोहोचलेली इमारत दुरुस्त करण्यात यावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन केलेल्या पाठपुराव्याचा आवाज जिल्हा प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचून या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिले जात असल्याने ही इमारत आता कात टाकीत आहे.
 
 
school
 
संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत या शाळेची इमारत आणि प्रांगणासाठी मंजूर करण्यात आलेल्या विस लाख रुपयातून या शाळेची डागडूजी व सुशोभीकरण करण्यात येत असून, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिंना उजाळा देण्याचे काम करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आठवण जिल्ह्यातील नागरिकांच्या स्मरणात राहावी यासाठी भग्न अवस्थेत पोहोचलेली ही Primary school building इमारत वारसा म्हणून जपण्यात यावी यासाठी अभा तांडा सुधार समिती, गोरसेना, परिवर्तन शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस कृष्णकुमार राठोड, पसच्या माजी सदस्या छाया मनोहर राठोड आदींनी सातत्याने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.