तर पाच वर्षात बौद्धांची वेगळी शैक्षणिक संस्था : राजरत्न आंबेडकर

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
विदर्भस्तरीय बौद्ध धम्म परिषद
 
वर्धा, 
शिक्षणाचे आज बाजारीकरण झाले आहे. शिक्षण व्यवस्था भांडवलदारांच्या हाती गेली. त्यामुळे सरकारी शैक्षणिक संस्था बंद पडत आहे. भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळेल की नाही याची खात्री नाही. यासाठी येत्या पाच वर्षात बौद्धांची वेगळी शैक्षणिक संस्था व अर्थव्यवस्था निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू Rajaratna Ambedkar डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.
 
 
Rajaratna
 
धम्मप्रिय सम्राट अशोकनगरी अंबानगर (सेवाग्राम) येथे Rajaratna Ambedkar  डॉ. भदन्त राजरत्न यांनी आयोजित केलेल्या विदर्भस्तरीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भदन्त आनंद महाथेरो आग्रा तर अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, धम्म परिषदेचे उद्घाटक गोल्डमॅन डॉ. रोहित पिसाळ, भदन्त सत्यानंद महाथेरो येनाळा, भदन्त डॉ. मेत्तानंद महाथेरो, भदन्त प्रज्ञाशील महाथेरो, भदन्त अरुणज्योती महाथेरो कोलकत्ता, भदन्त करुणाबोधी महाथेरो नागपूर, भदन्त बुद्धश्री महाथेरो मुंबई, भिक्षूसंघ, डॉ. राजा टाकसाळे, अनिल जवादे, प्राचार्य देवराव गजभिये, विभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, डॉ. राजकुमार शेंडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल मानकर, चित्रपट कार्यकारी निर्माता चरण हरले, युवा प्रबोधनकार प्रणोज बनकर, डॉ. कल्पना कांबळे, डॉ. विकास साठे, नितीन गजभिये, राजीव वानखेडे आदी उपस्थित होते.
 
 
ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी, आज बुद्धाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानच जगाला तारू शकते असे विचार व्यत केले. भदन्त सत्यानंद महाथेरो यांनी बुद्धाने दिलेला विज्ञानवादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा विहारातून झाला पाहिजे. विहार ही ज्ञानाची केंद्र झाली पाहिजे. बुद्ध विहार केवळ धम्माचे केंद्र नाही तर वाचनालय झाले पाहिजे, असे विचार व्यत केले. डॉ. रोहित पिसाळ यांनी प्रत्येकाला नोकरी मिळणारच असे नाही, त्यासाठी युवकांनी पुढे येऊन स्वयंरोजगार निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
 
 
Rajaratna Ambedkar  धम्म परिषदेमध्ये मॉनेस्ट्रीसाठी जमीन दान देणारे डॉ. राजाभाऊ टाकसाळे आणि अनिल जवादे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रमेश वानखडे, डॉ. राजकुमार शेंडे, प्राचार्य देवराव गजभिये, प्रमोज बनकर, सुशीला भगत, सुकेशनी जामगडे आदींची विचार व्यत केले. संचालन सुनील ढाले, प्रास्ताविक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक डॉ. भदन्त राजरत्न यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक मुकुंद नाखले यांनी मानले. यशस्वीतेसाठी नीरज ताकसांडे, सुहास थूल, देवानंद बोरकर, भगवान वनकर, शैलेश मानकर, सुशील व प्रशील पाटील, दिनेश वाणी, इंजि. राजेश खडसे, आदींनी सहकार्य केले.