यवतमाळ,
Rangoli competition रंगमंच व ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत संस्कार भारती यवतमाळ जिल्हा शाखा तसेच यवतमाळ अर्बन बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतमाता पूजनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यावरण’ या विषयाला अनुसरून ही रांगोळी स्पर्धा नि:शुल्क व सर्वांसाठी खुली आहे. ही स्पर्धा रविवार, 25 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 या वेळात यवतमाळ अर्बन बँकेचे मुख्य कार्यालय, एलआयसी चौक, गार्डन रोड येथे होणार आहे.
Rangoli competition स्पर्धेतील विजेत्यांना 2 हजार 100 रुपयांचे प्रथम, 1 हजार 500 रुपयांचे द्वितीय, तर 1 हजार 100 रुपयांचे तृतीय अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रजासत्ताक दिनी सोमवार, 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता यवतमाळ अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय परिसरात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाèयांनी संयोजक प्रदीप गज्जलवार (7066997409), सहसंयोजक आयुषी कार्लेकर (9096366998) किंवा संघटनेच्या उपाध्यक्ष शालिनी साठे (9922421077) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संस्कार भारती यवतमाळ अध्यक्ष प्राची बनगिनवार, मंत्री कमलेश मुंदेकर, यवतमाळ अर्बन बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज बोनगिरवार व सचिव अर्जुन खर्चे यांनी केले आहे.