ग्वाल्हेर,
Statement of Saint Rambhadracharya मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर दौऱ्यावर असलेल्या संत रामभद्राचार्य यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अविमुक्तेश्वरानंद महाराजांवर अन्याय झालेला नाही, तर त्यांनी स्वतः नियम मोडल्याचे दिसून आले. रामभद्राचार्य म्हणाले, मी जगद्गुरु आहे; ते अजून जगद्गुरुही नाहीत. रथाने गंगेच्या काठावर जाणे चुकीचे आहे. जेव्हा पोलिसांनी तुम्हाला थांबवले, तेव्हा तुम्ही जाऊ नये. आम्ही स्वतः संगमाला पायी जातो. त्यांनी (अविमुक्तेश्वरानंद) नियम मोडला आहे.
सरकारने अविमुक्तेश्वरानंद यांना पाठवलेल्या नोटीससंदर्भातही रामभद्राचार्य म्हणाले की, सरकारने योग्य सूचना दिल्या आहेत. सर्व काही बरोबर आहे.शंकराचार्यपदी अविमुक्तेश्वरानंद यांच्या नियुक्तीबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले, "सर्वोच्च न्यायालयाने अद्याप त्यांना शंकराचार्यपदी नियुक्त केलेले नाही. त्यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या 'हिंदू' या शब्दाविषयीच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. रामभद्राचार्य म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो की, दिग्विजय सिंह यांना धर्मग्रंथांबाबत माहिती नाही. मी काही धर्मग्रंथांमधील श्लोक उद्धृत करून 'हिंदू' शब्दाचे समर्थन केले आहे. त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास केला नाही, त्यामुळे त्यांना ते समजणार नाही. संत रामभद्राचार्य हे हिंदू धर्माचे एक प्रमुख संत असून त्यांना सनातन धर्माचे सखोल ज्ञान आहे. ते विविध माध्यमांमध्ये वारंवार आपल्या धर्मज्ञानाची मांडणी करत चर्चेत येतात आणि समाजाला मार्गदर्शन करतात.