बहुचर्चित हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात दहा आरोपींना जन्मठेप

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
अकोला,
hundiwale murder case महाराष्ट्र गवळी समाजाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज बुधवार, २१ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिला. यामध्ये आरोपी श्रीराम गावंडेसह दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

hundivale 
 
६ मे २०१९ रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात एका सुनावणीसाठी किसनराव हुंडीवाले आले होते.यावेळी त्यांची अंत्यत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात १५ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास प्रथम तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केला.त्यानंतर बाळापूर येथील सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी पुढील तपास करत एक हजारांहून अधिक कागदपत्रांची आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केली होती.hundiwale murder case सुनावणीदरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे
प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे, शेख साबीर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.या प्रकरणात विशेष सरकारी वकील अँड उज्वल निकम, जिल्हा सरकारी वकील अँड राजेश्वर उर्फ गिरीश देशपांडे यांनी काम पाहले.
 
जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी
श्रीराम गावंडे, रणजीत गावंडे, विक्रम गावंडे
सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे
सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर
दिनेश राजपूत