प्रशिक्षण उड्डाणावेळी दोन आसनी विमान पाण्यात कोसळले

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
प्रयागराज,
Two-seater plane crashes into water प्रयागराजमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी घटना घडली. केपी कॉलेज मैदानाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या जलाशयात प्रशिक्षणासाठी उड्डाण करत असलेले दोन आसनी खाजगी विमान कोसळले. हे विमान हवाई दलाच्या प्रशिक्षण मोहिमेचा भाग होते. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
 
 
Crop Loss Compensation
सुदैवाने या दुर्घटनेत विमानातील दोन्ही वैमानिक सुखरूप असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जलाशयात पडलेल्या विमानाजवळ पोहोचून वैमानिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तांत्रिक बिघाड किंवा प्रशिक्षणादरम्यान आलेली अडचण याबाबत तपास सुरू आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात गर्दी झाली होती, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.