अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
भंडारा : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर Two-wheeler-truck accident अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी चालकाने मागेहुन जोरदार धडक दिल्याने ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संकेत सपाटे असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर अपघात आज सकाळी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत सपाटे हा पहाटेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने भंडारा येथून लाखनीकडे जात होता. धारगाव जवळ पोहचला असता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्याच्या स्कूटीने मागेहोऊन जोरदार धडक दिली. या धडकेत संकेत स्कुटीवरून खाली कोसळला.
Two-wheeler-truck accident ही धडक इतकी जोरदार होती की संकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संकेतला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावर उभ्या राहणाऱ्या जड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.