जुन्या वादातून काका, पुतण्यास मारहाण

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
रिसोड,
Reshod assault case, लहान मुलांच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून काका व पुतण्यास चाकू, लोखंडी चेन, फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजता रिसोड तालुयातील लोणी येथे घडली.

Reshod assault case, 
२ जानेवारी रोजी लोणी येथील रामजीवन बन्सीलाल पन्सारी यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की १ जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता च्या दरम्यान मेघशाम हिरालाल पन्सारी, शुभम घनश्याम पन्सारी, शिवम उर्फ राज घनश्याम पन्सारी, यशम घनश्याम पन्सारी हे त्यांचे घरासमोर आले व तुझ्या मुलाने आमचे मुलासोबत भांडण केले या कारणावरून त्यांच्या डोयावर फायटरने तसेच हातावर चाकूने वार केले. हे पाहून त्यांचा पुतण्या मनोज पन्सारी ने मध्यस्थी करुन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला सुद्धा फायटर, लोखंडी चेन ने डोयावर हातावर मारून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी चौघांच्या विरोधा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.