‘तू मेलीस तर कर्ज माफ होईल’; कर्जातून सुटका मिळवण्यासाठी पत्नीला फिनायल पाजले

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
सतना,  
man-poisoned-wife-to-get-rid-of-loan मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३५ लाख रुपयांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी एका व्यक्तीने पत्नीला फिनायल मिसळलेले पाणी जबरदस्तीने पाजल्याचा आरोप आहे. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला असून, तिच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
man-poisoned-wife-to-get-rid-of-loan
 
ही घटना सतना शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगहा मोहल्ल्यात घडली. पीडित महिलेचे नाव पूर्णिमा त्रिपाठी असून, तिच्या पतीचे नाव अनुराग सोहन त्रिपाठी आहे. man-poisoned-wife-to-get-rid-of-loan पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनुरागने ‘रुद्रा इंटरप्रायझेस’ नावाने सर्जिकल साहित्याचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी एसबीआय बँकेकडून ३५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. विशेष म्हणजे हे कर्ज पूर्णिमाच्या नावावर होते, मात्र त्याचा संपूर्ण वापर पतीने केला. व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर कर्जाचा बोजा वाढू लागला. याच कारणातून अनुरागने पत्नीचा जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. २८ डिसेंबरच्या रात्री तो दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीशी शिवीगाळ व मारहाण केली. या मारहाणीत पूर्णिमाच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या दिवशी, २९ डिसेंबरच्या सकाळी पुन्हा वाद उफाळून आला. त्यावेळी आरोपीने बाथरूममध्ये ठेवलेल्या फिनायलच्या गोळ्या कुटून पाण्यात मिसळल्या आणि ते पाणी पत्नीला जबरदस्तीने पाजले. ‘तू मेलीस तर ३५ लाखांचे कर्ज माफ होईल,’ असेही त्याने म्हटल्याचा आरोप आहे.
फिनायलयुक्त पाणी पिल्यानंतर पूर्णिमाची प्रकृती झपाट्याने खालावली. तिला सतत उलट्या होऊ लागल्या आणि ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिने वडिलांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. नातेवाईकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. बिरला रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले आणि १ जानेवारीपर्यंत ती रुग्णालयात दाखल होती. डिस्चार्जनंतर पूर्णिमाने कुटुंबीयांसह सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. man-poisoned-wife-to-get-rid-of-loan तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती अनुराग त्रिपाठीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(२) अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतरपासूनच पतीचा छळ सुरू होता. यापूर्वीही मारहाणीबाबत जसो पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या घटनांचे फोटोही तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आले आहेत. पूर्णिमाचे वडील राजकुमार पांडेय यांनी सांगितले की, जून २०२० मध्ये मुलीचे लग्न झाले होते, मात्र काही महिन्यांतच जावयाचे वर्तन हिंसक बनले. अनेकदा समज देऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. man-poisoned-wife-to-get-rid-of-loan या दाम्पत्याला साडेतीन वर्षांचा एक मुलगाही आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.