१० हजार विद्यार्थांनी घातले सूर्यनमस्कार

गोविंददेव गिरी महाराज होते उपस्थित

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
surya-namaskar : गीता परिवार व श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गीता परिवार चतुर्दशक महोत्सवा निमित्त १० हजार विद्यार्थ्यांचे सामुहिक सूर्यनमस्कार व गीता श्लोक पठन शनिवारी सकाळी उत्साहात झाले.
 
 
 
amt
 
 
 
गीता परिवार मागील चार दशकापासून संपूर्ण भारतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये संस्कार शिबीर, संस्कार वर्ग, योगासने, युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आणि मुक्त शिक्षण याचा त्यात समावेश आहे. हे उपक्रम राबविल्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि बौध्दिक विकास साधून सुसंस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होत आहे. गीता परिवार यावर्षी आपला चतुर्दशक सोहळा साजरा करीत आहे. त्यानिमित्त विद्यार्थांचे सामुहिक सूर्यनमस्कार व गीता श्लोक पठन कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी ७ वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणावर सूर्यनमस्कार झाले.
 
 
 
या कार्यक्रमाकरीता श्रीराम जन्मभूमि अयोध्या न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रिया देशमुख होत्या. कार्यक्रमाकरिता अमरावती शहरातील व जिल्हयातील क्रीडा प्रेमी तसेच सर्व नागरिक उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमाचे विदर्भ प्रमुख शोभा हरकुट, प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. नयना कड्डू, ज्ञानेश्वर टाले, मुख्याध्यापक संदिप इंगोले व गीता परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.