कारंजा लाड,
108 ambulance negligence, राज्य शासनाच्या १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेतील गंभीर हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून, जिल्ह्यातील कारंजा तालुयातील काकडशिवणी येथील रुग्ण चंद्रशेखर घुले यांना तातडीच्या उपचारासाठी कारंजा येथून अमरावती येथे हलविण्यात तब्बल दीड तासाचा विलंब झाल्याचा प्रकार १ जानेवारी रोजी सायंकाळी घडला.
रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने १०८ रुग्णवाहिकेसाठी ज्योती गणेशपुरे यांनी तात्काळ फोन केला असता, कॉल सेंटरकडून रुग्णवाहिका दीड तास उशिरा पोहोचेल असे उत्तर देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण रुग्णालय, कारंजा येथे १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होती. वाहन चालक (पायलट) देखील उपस्थित होता. मात्र रुग्णवाहिकेसोबत आवश्यक असलेले १०८ सेवेचे डॉटर अनुपस्थित असल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले नाही. परिणामी रुग्णाला अनावश्यक प्रतीक्षा करावी लागली. या हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या उपचारात दीड तासाचा मौल्यवान वेळ वाया गेला आणि २ जानेवारीला पहाटे ४ वाजता त्यांचे निधन झाले. आपत्कालीन सेवेतील असा निष्काळजीपणा रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारा असून, याबाबत संबंधित यंत्रणेने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
१०८ सारखी अत्यावश्यक सेवा जर डॉटरांच्या अनुपस्थितीमुळे ठप्प राहत असेल, तर आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.