अभय सातव यांचा अपघातात मृत्यू

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
वाशीम, 
abhay-satav : वाशीमवरुन अनसिंगकडे आपले काम अटपून येत असताना झालेल्या भीषण अपघातात अभय शिवाजी सातव (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात रात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
 
 
 
satav
 
 
 
याबाबत सविस्तर असे की, अभय सातव हा युवक एम.एच. ४६ बी.व्ही. ०३७४ क्रमांकाच्या वाहनाने वाशीम येथील काम आटोपून आपल्या अनसिंग या गावाकडे येत असतांना हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.या अपघातात अभय सातव यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेले मित्र गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाशीम येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अभय सातव यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.