अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
सातारा

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan सातारा शहरात सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक घटना घडली असून संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. साहित्य संमेलनाच्या स्थळीच हा प्रकार घडल्याने साहित्यिक, आयोजक आणि उपस्थितांमध्ये खळबळ उडाली आहे.
 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 
गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात साहित्य संमेलनाच्या जोरदार तयारीला वेग आला होता. संमेलनाचे प्रतीक नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथे सोडण्यात आले होते. १ जानेवारी रोजी या भव्य साहित्य महोत्सवाला अधिकृत सुरुवात झाली. मात्र, त्याचदरम्यान कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.हा हल्ला नेमका कोणी केला आणि त्यामागचा उद्देश काय होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेमुळे संमेलनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
 
 
दरम्यान, शाहू Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan  स्टेडियम येथे सुरू असलेल्या या साहित्य संमेलनात दीडशेहून अधिक पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. पर्यावरण, सामाजिक विषयांवरील विविध उपक्रम, वाचकांची वेशभूषा, संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलाचे सुशोभीकरण, राज्यभरातून आलेल्या साहित्यिक व वाचकांची मोठी उपस्थिती या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरत आहे. कार्यक्रमांसाठी दोन मुख्य मंडप, ग्रंथदिंडीत ५२ चित्ररथांचा समावेश, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन मंच आणि वाचक मंच अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळ फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. १ जानेवारी रोजी संमेलनाचे ध्वजारोहण अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.हल्ल्याच्या घटनेमुळे साहित्यिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात असून, आयोजकांकडून सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.