मुंबई,
bangladeshi-player-mustafizur भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाला मोठा निर्णय कळवला आहे. बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याला संघातून मुक्त करण्याचे निर्देश बीसीसीआयने दिले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयशी बोलताना या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
बांग्लादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीच्या निर्घृण हत्येनंतर निर्माण झालेल्या तीव्र प्रतिक्रिया आणि त्यातून निर्माण झालेला सीमापार तणाव हा विषय भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने केकेआरला स्पष्टपणे कळवले आहे की मुस्ताफिजूर रहमान याला संघातून वगळण्यात यावे. bangladeshi-player-mustafizur परिणामी, तो आता आयपीएल 2026 चा भाग राहणार नाही. देवजीत सैकिया यांनी सांगितले की, “सध्या घडत असलेल्या घडामोडी लक्षात घेता बीसीसीआयने केकेआर फ्रँचायझीला मुस्ताफिजूर रहमानला रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जर केकेआरला त्याच्या बदल्यात दुसरा खेळाडू हवा असेल, तर त्या रिप्लेसमेंटला परवानगी देण्यात येईल.”

मुस्ताफिजूर रहमान हा बांग्लादेशचा एक नामांकित वेगवान गोलंदाज असून तो जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने 2016 पासून सहभाग घेतला असून सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. bangladeshi-player-mustafizur आतापर्यंत आयपीएल मधील 60 सामन्यांत त्याने 65 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, आयपीएल 2026 च्या लिलावात केकेआरने मुस्ताफिजूर रहमानला तब्बल 9.20 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र आता बीसीसीआयच्या निर्देशांनंतर त्याचा केकेआर आणि आयपीएल मधील प्रवास थांबला आहे.