भाजपा नेत्याकडून विजय वडेट्टीवारांविरोधात पोलिस तक्रार, मानहानीची नोटीसही बजावली

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
वाशिम,   
complaint-against-vijay-wadettiwar वाशिममध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपाचे नेते आणि वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी ही तक्रार वाशिम पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
 
complaint-against-vijay-wadettiwar
 
नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी राजू पाटील राजे यांच्यावर बनावट नोटांच्या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत असा कोणताही गुन्हा राजू पाटील राजे यांच्या विरोधात नोंदलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि प्रतिमेला धक्का देणारे असल्याचे सांगत भाजप नेत्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. complaint-against-vijay-wadettiwar वाशिम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय चौधरी यांनी सांगितले की, राजू पाटील राजे आणि त्यांच्या समर्थकांकडून तक्रार प्राप्त झाली असून, त्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच वाशिम पोलीस ठाण्यात राजू पाटील राजे यांच्याविरोधात बनावट नोटांबाबत कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंदलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपा नेते राजू पाटील राजे यांनी विजय वडेट्टीवार यांनी जाणीवपूर्वक आपली बदनामी केल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.