वर्धा,
bodybuilding-competition : युवा एकता क्रीडा मंडळाने बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन विदर्भ व बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या संयुत वतीने ५ रोजी सायंकाळी ४ वाजता केसरीमल कन्या शाळेच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या बक्षिय वितरण समारोहाला प्रसिद्ध सिने अभिनेते गोविंदा यांची उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धा पाच गटात होणार आहे. पहिला गट ५० ते ६० किलो, दुसरा गट ६० ते ६५ किलो, तिसरा गट ६५ ते ७० किलो, चौथा गट ७० ते ७५ किलो व पाचवा गट ७५ किलोच्या वरचा आहे. उद्घाटक म्हणून क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, समीर मेघे, आ. समीर कुणावार, आ. सुमित वानखेडे, आ. राजेश बकाने, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी खा. रामदास तडस, सुरेश वाघमारे, माजी आ. सुधाकर कोहळे, विदर्भ बॉडी बिल्डर्स एसोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गावंडे, विशेष अतिथी म्हणून कडकनाथ अॅग्रो वर्ल्ड नाशिकचे संदीप सोनवणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व मान्यवर उपस्थित राहणार आहे.