धानोरा,
sudhakar-adbale : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे नववर्षाचे स्वागतानिमित्य आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याला आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन संवाद सांधला. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना बाल वयात व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, स्वकष्टाचे महत्त्व कळावे आणि स्वतः कमावलेल्या पैशाची मूल्य काय असते त्यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे, यासाठी आणि समाजाचा सहभाग मिळावा या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला.
आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे, डॉ. रश्मी डोके, पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, एस. एम. रत्नागिरी, प्रा. विजय बुरमवार, प्रा. विलास भोगे, रजनी मडावी, कांचन दशमुखे, अशोक कोल्हटकर, मोहन देवकते, रेखा कोरेवार, प्रियका आनंदवार आदींच्या उपस्थितीत करण्याल आले.
या मेळाव्यात मनोरंजनात्मक खेळ, विविध खाद्य पदार्थ टाल्स लावण्यात आले. वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी स्वतः गुलाबजाम, अंडा बिर्याणी, दाबेली, आयुर्वेदिक भाजिया, गोलगप्पे, विविध खाद्य पदार्थ तिथेच तयार करून टाल्सवर विक्री केली. विद्यार्थ्यांनी, शिक्षक व गावातील नागरिकांनी या मेळाव्याचा आनंद घेऊन खाद्य पदार्थावर ताव मारला. मुलांनी बनवलेल्या चविस्ट खाद्य पदार्थाची चव घेऊन पालकांनी तसेच मान्यवरांनी लहान मुलांच्या पाक कलेचे कौतुक केले. विशेष बाब म्हणजे, नागपूर माध्यमिक शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांनी यावेळी भेट देऊन मेळाव्यातील मनोरंजन खेळ आणि खाद्य पदार्थाचा आस्वाद घेऊन मुलांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी शिक्षकांशी चर्चा केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील क्रीडा शिक्षक ओम देशमुख, प्रमोद शेंडे, देवेंद्र भालेराव, उमराणी चेलमेलवार, श्रीमती किर्ती, गीतांजली जुनघरे, भालचंद्र कोटगले, जयराम कोरेटी यांनी परिश्रम घेतले.