मुख्यमंत्र्याचा अमरावतीत रोड शो होणार

भाजपा उमेदवारांचा करणार प्रचार

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
devendra-fadnavis : महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो रविवारी सकाळी ११ वाजतापासून अमरावतीत होणार आहे, अशी माहिती भाजपाचे निवडणूक निरीक्षक आ. संजय कुटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी दिली.
 
 
 
amt
 
 
 
मुख्यमंत्र्यांचा रोड शो पंचवटी चौकातून सुरू होईल. पुढे शेगाव नाका चौक, नवीन कॉटन मार्केट मार्गे चौधरी चौक, आदर्श हॉटेल, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड, नवीन बियाणी चौक, साई नगर, साई मंदीर पर्यंत हा रोड शो होणार आहे. जवळपास ६ किलोमिटरचा हा मार्ग आहे. या मार्गातल्या प्रत्येक चौकात मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत होणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजपा कार्यकर्त्यांची व नागरिकांची गर्दी राहणार आहे. काही ठिकाणी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहे. या रोड शो साठी विशेष वाहन तयार करण्यात आले आहे. संपर्ण मार्गावर भाजपाचे झेंडे, पताका, होर्डींग लावण्यात येणार आहे. भाजपाचे सर्व उमेदवार या रोड शो मध्ये सहभागी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपरोक्त नेत्यांनी व भाजपाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.