सातारा
chhagan bhujbal सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त आज आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद पाटील आणि इतर उपस्थित होते. नुकतीच हृदय शस्त्रक्रिया झालेली असतानाही मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
भुजबळ म्हणाले, “ऑपरेशन होऊन दोन महिने झाले, मात्र डॉक्टरांची परवानगी घेऊन मी कार्यक्रमाला आलो आहे. सावित्रीबाई फुलेंना नमन करतो. नायगावमध्ये पहिल्यांदा इतकी मोठी गर्दी पाहिली. सुशीलकुमार यांच्या काळात जीर्णोद्धारासाठी ३५ लाख खर्च झाले. आता सरकारने १५० कोटी दिले. देवा भाऊ देता है, तो छप्पर फाडके देता है,” असे त्यांनी कोडकौतुक करत सांगितले.
कार्यक्रमात मंत्री chhagan bhujbal मकरंद पाटील यांनी या भागात शैक्षणिक हब सुरू करण्याची मागणी केली, ज्यामुळे औद्योगीकरणासह स्थानिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, मंत्री जयकुमार गोरे यांनी नायगावचे नाव बदलून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई नगर’ करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, “सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची चर्चा जुनी आहे, मात्र पुढे काही प्रगती झाली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर याला गती मिळाली. 110 कोटींचे भव्य दिव्य स्मारक उभे राहिले असून आणखी 50 कोटींची गरज आहे. हे स्मारक त्यांच्या मूळ गावी उभारावे ही माझी ग्राम विकास मंत्र्याच्या नात्याची जबाबदारी आहे.”
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. उपस्थितांनी या स्मारकाच्या उभारणीसाठी प्रशंसा व्यक्त केली आणि पुढील कार्यासाठी सहकार्याची घोषणा केली. कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुलेंच्या योगदानाची आठवण करून दिली गेली आणि त्यांच्या समाजसुधारणेतील कार्याला सलाम ठोकण्यात आला.