दिग्रसला नवनिर्वाचित नप अध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

श्री जैन श्वेतांबर संघ व मेहता परिवाराचा पुढाकार

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस,
digras-news : येथील श्री जैन श्वेतांबर संघ व सतिष मेहता परिवाराच्या पुढाकारात शनिवार, 3 जानेवारीला स्थानिक जैन भवन येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नुकताच नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि नगराध्यक्षांसह 25 नगरसेवक निवडून आलेत. हे सारे विविध पक्षांचे असले तरी यांच्या माध्यमातूनच आता शहराचा सार्वजनिक विकास होणार आहे. लोकांच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झालेल्या या जनसेवकांचा उत्साह द्विगुणित करण्याच्या मुख्य उद्देशातून समाजसेवी सतीष मेहता यांनी व येथील श्री जैन श्वेतांबर संघाने भव्य सत्कार सोहळा आयोजित करून सर्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे संचालन कपिल बोरुंदिया यांनी केले. तर प्रास्ताविक सतिष मेहता यांनी केले.
 

y3Jan-Shwetamber 
 
 
यावेळी नगराध्यक्ष पंचशीला इंगोले, नगरसेवक अनुक्रमे प्रभाग क्रमांक 1 च्या पूजा राऊत, बाळू जाधव, प्रभाग 2 अंजली राऊत, डॉ. संजय बंग, प्रभाग 3 कविता सुकळकर, नीलेश कुटे, प्रभाग 4 स्वाती धाडवे, संदीप झाडे, प्रभाग 5 कैलास जाधव, लक्ष्मी मेहता, प्रभाग 6 चेतना पवार, नुरमोहंमद खान, प्रभाग 7 वैशाली दुधे, नीता नवरे व सचिव बनगिनवार, प्रभाग 8 किशोर कोहचडे, अरुणा रत्नपारखी, प्रभाग 9 रामेश्वर नरळे, आस्मा फातेमा, प्रभाग 10 रुस्तम पप्पुवाले, रहमत रमजान पटेल, प्रभाग 11 शेख बिलाल, शगुफ्ता अक्रम, प्रभाग 12 सायमा तबसुम, अब्दुल गफ्फार सत्तार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.