एक्सपायर फूड प्रोडक्ट्सची सर्रास विक्री सुरू

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ !

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Expired Food Products शहरात काही फूड प्रोडक्ट्स विक्रेत्यांकडून खाण्यास अयोग्य तसेच एक्सपायर झालेल्या अन्नपदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. रोजच्या गरजांसाठी नागरिक विश्वासाने खरेदी करत असलेल्या खाद्यपदार्थां मधूनच आजार पसरवण्याचे काम काही व्यापाऱ्यांकडून केले जात आहे. केवळ नफ्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आरोग्याशी थेट तडजोड केली जात असून ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे.
 
 
 
pakits
 
विशेष म्हणजे, काही दुकानदारांकडून एक्सपायरी तारीख बदलणे, पॅकिंगमध्ये छेडछाड करणे अथवा जुने साठवलेले अन्नपदार्थ नव्याच्या नावाखाली विकले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.Expired Food Products यामुळे अन्नातून विषबाधा, पोटाचे आजार, संसर्गजन्य रोग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.या प्रकारांकडे अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन शहरभर तपासणी मोहिम राबवावी तसेच दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकां कडून होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सौजन्य: स्वप्नील सौभागे,संपर्क मित्र