हिंगणघाट,
fire-at-jalaram-industries : शहराजवळील येणोरा मार्गावरील चंदाराणा यांच्या जलाराम इंडस्ट्रीज येथे भीषण आग लागली. या आगीत कारखान्यात साठवलेली रुई व बारदाना जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज शनिवार ३ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जलाराम इंडस्ट्रीजमध्ये कापसावर प्रक्रीया करून सरकी बाहेर काढल्या जाते. या कारखान्यातू सकाळी १० वाजताच्या सुमारास आगीचे लोळ निघताना दिसले. आगीची माहिती कारखाना मालक व वरिष्ठ अधिकार्यांना देऊन हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान गौरव गाणार, अमित शाहरे, ओम लढी, पंकज तळवेकर, सुनील डोळस आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे आग इतर भागात पसरण्यापासून रोखता आली. मात्र रुई व बारदाना मोठ्या प्रमाणात जळाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.