आता बसणार दंड! एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत संपली

कारवाईचे मात्र अद्याप आदेश नाही

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
HSRP number plate, वाहनांना उच्च-सुरक्षा नाेंदणी प्लेट (एसएसआरपी) लावण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आली हाेती. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून राज्य परीवहन विभाग आणि पाेलिस विभाग धडाक्यात कारवाई करण्याच्या तयारीत हाेते. मात्र, अद्याप शासनाकडून कारवाई करण्याबाबत काेणतेही आदेश आले नाही. त्यामुळे पाेलिस आणि आरटीओ विभागाने कारवाईचे शस्त्र म्यान केले आहे.
 

HSRP number plate, 
सुरक्षेच्या HSRP number plate दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी नियमांचे काटेकाेर पालन हाेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक वाहनावर एचएसआरपी क्रमांकाची पाटी असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे वाहन चाेरीच्या घटनांवर नियंत्रण मिळेलच, शिवाय बनावट किंवा बदललेल्या नंबर प्लेटच्या आधारे हाेणाèया विविध गुन्ह्यांनाही आळा बसेल, असा दावा केला जात आहे. राज्य शासनाने 2019 पूर्वी नाेंदणी असलेल्या प्रत्येक वाहनांना उच्च-सुरक्षा नाेंदणी प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शासनाने एप्रिल 2025 पासून आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली हाेती. 31 डिसेंबर ही अंतिम मुदत हाेती. त्यानंतर काेणतीही मुदतवाढ देता थेट कारवाई करण्याची आक्रमक भूमिका आरटीओ आणि पाेलिस विभागाने घेतली हाेती. त्यामुळे नववर्षांच्या पहिल्याच दिवसांपासून एचएसआरपी न लावणाèया वाहनांवर कारवाईचा धडाका सुरु हाेणार हाेता. मात्र, नवीन वर्षाच्या तिसèया दिवशीही कारवाई झाली नाही. मात्र, आरटीओ विभागाने कारवाई करण्याचे आदेश नसल्याची बाब स्पष्ट केली. त्यामुळे आता अनेकांना दिलासा मिळाला आहे.
 
 
वाहनचालकांमध्ये संभ्रम
शासनाने एचएसआरपी क्रमांक असलेली पाटी बसवण्यासाठी पहिली मुदत 31 मार्च 2025 दिली हाेती. त्यानंतर 30 जून पासून ते 31 डिसेंबर पर्यंत पाच वेळा मुदत वाढ दिली. त्यानंतरही राज्यात निम्याहून जास्त वाहन धारकांनी एचएसआरपी पाटी लावण्याची तसदी घेतलेली नाही. 1 जानेवारीपासून कारवाई हाेणार अशी चिन्हे असतानाच चक्क आरटीओ विभागानेच कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 
 
 
 
40 टक्के वाहने अद्यापही नाेंदणी विना
आतापर्यंत नागपुरात HSRP number plate 8 लाख 60 हजार वाहनांची नाेंदणी झाली आहे. शहरात जवळपास 18 लाखांपेक्षा जास्त वाहने असून उर्वरित जवळपास 9.50 लाख वाहनांची नाेंदणी हाेणे शक्य नाही. तसेच ग्रामीणमध्ये केवळ 2 लाख 75 हजार वाहनांची नाेंदणी झाली असून अद्याप 6 लाख 25 हजार वाहनांची नाेंदणी बाकी आहे.एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत संपली असून अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी अद्याप आम्हाला शासनाचे आदेश आले नाही. आदेश आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. आणखी एकदा मुदतवाढ देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- किरण बिडकर (प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर )