चीन म्हणतो... भारत–पाकचा 'पॅचअप' मी करून दिला”

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली
China mediation claim पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला होता. सीमारेषेवर दोन्ही देशांकडून हल्ले–प्रतिहल्ले झाले आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र काही दिवसांतच युद्धविराम जाहीर झाला. या युद्धविरामाचे श्रेय सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले होते आणि पाकिस्ताननेही त्या दाव्याला दुजोरा दिला होता. आता या पार्श्वभूमीवर चीनने मध्यस्थी केल्याचा दावा केल्याने आणि पाकिस्तानने त्यास पाठिंबा दिल्याने या संपूर्ण घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.
 
 

China mediation claim  
पाकिस्तानी परराष्ट्र China mediation claim  कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी सांगितले की, ६ ते १० मे या अत्यंत तणावपूर्ण काळात चिनी नेतृत्व पाकिस्तानच्या सातत्याने संपर्कात होते. चीनने केवळ पाकिस्तानच नव्हे, तर भारतीय नेतृत्वाशीही संवाद साधला होता, असा दावा त्यांनी केला. चीनच्या सक्रिय आणि “सकारात्मक राजनैतिक कूटनीतीमुळे” सीमावरील तणाव कमी झाला आणि युद्ध टळले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. बीजिंगने भारत–पाक संघर्षात ‘मध्यस्थ’ म्हणून भूमिका बजावल्याचा चीनचा दावा पाकिस्तानने उघडपणे मान्य केल्याचे हे पहिलेच उदाहरण मानले जात आहे.
 
 
 
 भारताची स्पष्ट भूमिका
 
मात्र या दाव्यांवर China mediation claim  भारताने स्पष्ट भूमिका मांडली आहे. भारताने सुरुवातीपासूनच कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला किंवा मध्यस्थीला ठाम नकार दिला आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेली युद्धबंदी कोणत्याही परकीय दबावामुळे नव्हती. जमिनीवरील वास्तव परिस्थिती आणि लष्करी स्तरावरील संवादामुळेच युद्धविराम झाला. भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी त्यांच्या भारतीय समकक्षांशी संपर्क साधून युद्धबंदीची विनंती केली होती आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित झाली. याआधी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केलेला मध्यस्थीचा दावा भारताने फेटाळून लावला होता.दरम्यान, पाकिस्तानच्या ताज्या विधानामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः या भूमिकेतील ‘विलंब’ चर्चेचा विषय ठरत आहे. दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर अचानक चीनला श्रेय देणे ही पाकिस्तानच्या बदलत्या राजनैतिक रणनीतीचा भाग असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. काही काळापूर्वीपर्यंत पाकिस्तान या संपूर्ण प्रक्रियेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका निर्णायक असल्याचे ठासून सांगत होता. आता मात्र चीनला पुढे करून पाकिस्तान बीजिंगचा प्रादेशिक प्रभाव अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
 
 
 
भारत–पाक तणावाच्या या पार्श्वभूमीवर, मध्यस्थीच्या श्रेयावरून सुरू झालेला राजनैतिक संघर्ष हा दक्षिण आशियातील सत्तासमीकरणे आणि महासत्तांच्या प्रभावासाठी सुरू असलेल्या स्पर्धेचे द्योतक मानला जात आहे. युद्धविराम टिकून राहतो की या दाव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटते, याकडे संपूर्ण प्रदेशाचे लक्ष लागले आहे.