अमेरिका,
umar khalid mamdani letter controversy अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर जोहरान ममदानी यांनी तिहार तुरुंगात कैद असलेल्या माजी जेएनयू विद्यार्थी उमर खालिद यांना पाठविलेल्या समर्थनपत्रामुळे भारताच्या राजकारणात नव्या वादाचा जन्म झाला आहे. ममदानी यांनी आपल्या पत्रात उमर खालिद आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचा उल्लेख केला असून, त्यांच्या दीर्घकालीन कारावासाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, त्यांनी या प्रकरणाकडे मानवाधिकारांच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
या पार्श्वभूमीवर काही अमेरिकी खासदारांनीही भारत सरकारला पत्र लिहिले आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष (भाजपा )कडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर राहुल गांधींचा फोटो पोस्ट करत आरोप केला की, ‘भारतविरोधी लॉबी’ सक्रिय असून परदेशातून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरोपची झळती
भंडारी म्हणाले, “2024 मध्ये अमेरिकेत राहुल umar khalid mamdani letter controversy गांधी यांची खासदार शाकोव्स्की यांच्याशी भेट झाली होती आणि त्या वेळी भारतविरोधी वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इल्हान उमरही उपस्थित होते. जानेवारी 2025 मध्ये शाकोव्स्की यांनी ‘आंतरराष्ट्रीय इस्लामोफोबियाविरोधी कायदा’ मांडला, ज्यात भारताचा स्पष्ट उल्लेख आहे. कट टू 2026 मध्ये शाकोव्स्की यांनी भारत सरकारला पत्र लिहून दंगली आणि हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात उमर खालिदबाबत चिंता व्यक्त केली.”भंडारींनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, “भारतविरोधी शक्ती राहुल गांधींच्या भोवती का गोळा होत आहेत? जेव्हा परदेशात भारतविरोधी वक्तव्ये किंवा मोहीम राबवली जातात, तेव्हा पार्श्वभूमीवर एकच नाव पुन्हा पुन्हा पुढे येते आणि ते म्हणजे राहुल गांधी. भारताला कमकुवत करण्याचे, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला बदनाम करण्याचे आणि दहशतवादविरोधी कायदे कमजोर करण्याचे प्रयत्न करणारे लोक शेवटी त्यांच्याच आसपास एकत्र येतात.”
भाजपाच्या आरोपानुसार, ममदानींचे पत्र आणि अमेरिकेतील खासदारांच्या हस्तक्षेपामुळे भारताच्या स्वायत्त निर्णयप्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकरणाला राष्ट्रीय राजकारणात मोठा वाद मिळाला आहे.