पट्टाया,
indian-citizen-assaulted-in-thailand थायलंडमधील पट्टाया शहरातील वॉकिंग स्ट्रीट परिसरात २९ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ५२ वर्षीय भारतीय पर्यटकावर काही ट्रान्सजेंडर महिलांकडून मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, लैंगिक सेवांचे पैसे देण्यास नकार दिल्यामुळे हा वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, गर्दीच्या पर्यटनस्थळी सुरुवातीला पैशांवरून शाब्दिक वाद झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संबंधित भारतीय पर्यटकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापती झाल्या असून, त्याच्या अंगावर सूज आणि जखमा आढळून आल्या आहेत. indian-citizen-assaulted-in-thailand जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थायलंडच्या स्थानिक माध्यमांनुसार, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सौजन्य : सोशल मीडिया
पट्टाया हे शहर त्याच्या रंगीबेरंगी नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनियंत्रित लैंगिक पर्यटनामुळे येथे वारंवार अशा प्रकारच्या वादांची आणि हिंसक घटनांची नोंद होत असते. indian-citizen-assaulted-in-thailand थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी या भागात एक कोटीहून अधिक पर्यटक येतात. अनेक पर्यटक अनौपचारिक सेवांमध्ये सहभागी होत असल्याने गैरसमज, पैशांवरून वाद आणि त्यातून हिंसाचाराचे प्रकार वाढताना दिसत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा पत्तायामधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.