सावधान! 'हा नंबर' चुकीने डायल करू नका – गृह मंत्रालयाची 'कडक' सूचना

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Indian Cyber Crime Coordination Centre गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा एजन्सी I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) ने नागरिकांना एक नवीन प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरूक केले आहे. एजन्सीच्या माहितीनुसार, काही अनोळखी व्यक्ती किंवा हॅकर्स नागरिकांना डिलिव्हरी एजंट, कुरिअर किंवा इतर सेवा प्रदात्यांच्या नावाखाली कॉल करून फसवू शकतात. या कॉलदरम्यान, नागरिकांना काही खास USSD कोड डायल करण्यास सांगितले जाते, जे डायल करताच त्यांच्या मोबाइलवरील कॉल हॅकर्सच्या कडे फॉरवर्ड होतात आणि त्यांचा बँक अकाउंट रिकामी होऊ शकतो.
 
 

Indian Cyber Crime Coordination Centre 
USSD म्हणजे Unstructured Supplementary Service Data, ही एक विशेष सेवा आहे जी इंटरनेटशिवाय मोबाइलवर अनेक व्यवहार करण्यास वापरली जाते. हॅकर्स या सुविधेचा गैरवापर करून नागरिकांना फसवतात. फसवणूक करणारे नागरिकांना नेटवर्कमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे सांगून कोणत्या तरी नवीन नंबरवर कॉल करण्यास सांगतात. अनेक लोक या अफवांमध्ये येऊन दिलेल्या कोड्सवर कॉल करतात, आणि त्यामुळे त्यांचे मोबाइल कॉल हॅकर्सच्या नियंत्रणात जातात.सरकारने नागरिकांना काही USSD कोड्स कधीही डायल करू नये, असे स्पष्ट सांगितले आहे. या कोड्समध्ये 21, 61, 62, आणि 67 क्रमांकांसह मोबाइल नंबर डायल करणे समाविष्ट आहे. या कोड्सवर कॉल केल्यास सर्व कॉल हॅकर्सकडे फॉरवर्ड होतात. जर कुणी चुकीने हे कोड्स डायल केले, तर ##002# डायल करून कॉल फॉरवर्डिंग लगेच बंद करता येते. याशिवाय, नागरिकांनी तात्काळ आपल्या सेवा प्रदात्याच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर या फसवणुकीची नोंद करणे आवश्यक आहे. फीचर फोन वापरणारे नागरिक **1930** या हेल्पलाइनवर कॉल करून सायबर फसवणुकीची तक्रार करू शकतात.
 
 
I4C ने नागरिकांना Indian Cyber Crime Coordination Centre सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका, असे निर्देश दिले आहेत. सरकारी आणि बँकिंग सेवा संबंधित कॉल्स नेहमीच अधिकृत क्रमांकांवरून येतात, आणि अशा कोणत्याही कोड किंवा फोन नंबर डायल करण्यापूर्वी दोनदा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.सायकबर फ्रॉडच्या या नव्या प्रकारामुळे नागरिकांनी मोबाइल सुरक्षा उपायांची काळजी घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी सतर्क राहणे हेच सध्याच्या काळातील सर्वोत्तम संरक्षण आहे.