नागपूर,
IPS Nilambari Jagdale नागपूरची लेक निलांबरी विजय जगदळे (IPS) यांची इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, पंजाब या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली असून त्यांनी १ जानेवारी २०२६ पासून आपला नवा कार्यभार स्वीकारला आहे. ही नियुक्ती नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
VRCE नागपूर येथून पदवी प्राप्त केलेल्या निलांबरी जगदळे यांनी उज्ज्वल व चांगल्या पगाराची नोकरी सोडून IPS होण्याचे स्वप्न जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पूर्ण केले.IPS Nilambari Jagdale त्यांच्या या यशामुळे आजच्या तरुणाईसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे. किरण बेदी यांच्यानंतर निलांबरी जगदळे या तरुण पिढीसाठी रोल मॉडेल ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.निलांबरी जगदळे यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सौजन्य: रवि वाघमारे, संपर्क मित्र