पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात दीडशेंची आरोग्य तपासणी

*रक्तदानातून सामाजिक बांधिलकी

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
journalists-health-check-up-camp : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने तथा वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या पुढाकारातून आज शनिवार ३ रोजी स्थानिक संत शिरोमणी नामदेव महाराज मठात आरोग्य तपासणी, रतदान, मरणोपरांत अवयवदान संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १५२ व्यक्तींनी आरोग्य तपासणी करून घेतली. ८ जणांनी रतदानाद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासली. तर, तीन व्यक्तींनी अवयवदानाचा संकल्प केला.
 
 
 
oik
 
 
 
शिबिर माध्यम प्रतिनिधी, त्यांचे कुटुंबिय व वृत्तपत्र कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रवीण धोपटे, संगीता भोयर, पवन काकडे यांनी मरणोपरांत अवयवदानाचा संकल्प केला. १५२ व्यक्तींनी रत, नेत्र, दंत, नाक-कान-घसा, हृदयरोग, ईसीजी तपासणी करून घेतली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. चकोर रोकडे, डॉ. कीर्ती कारोडकर, डॉ. संगीता चोपकर, डॉ. रिचा शर्मा, डॉ. प्राजता काकडे, राजू गोरडे, रमेश निमजे, गजानन गावंडे, प्रफुल्ल व्यास आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व सहकार्‍यांनी रुग्ण तपासणी केली. आयोजनाकरिता महेश सायखेडे, विशाल कट्टोजवार, पवन काकडे, सचिन म्हात्रे, मिनल गोवाडे, अश्विनी आसुटकर, मंजुषा पाटील, विशाल लऊळ, राहुल बुचुंडे, हर्षल ढोबळे, शिल्पा नारायणे, प्रतीक आरख, तन्वी भावरकर, प्रफुल्ल काकडे, रवींद्र वाघमारे, प्रशांत ताथोडे, दीक्षा वाघमारे, प्रवीण गावंडे, वैशाली जगताप, प्रणाली भट, अंकुश कांचनपुरे, दीपक जाधव, किशोर महाजन, कार्तिक पोराटे, सुमित कोलाडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
 
 
धकाधकीच्या युगात जीवनशैलीत बदल झाला आहे. त्यामुळे विविध आजार उद्भवतात. अशा काळात वयाची चाळीची पार केलेल्या व्यक्तींनी वर्षातून किमान दोनदा तरी आरोग्य तपासणी करायलाच हवी. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे डॉ. चकोर रोकडे यांनी सांगितले.