कर्मण्नेय स्कूलमध्ये ‘स्पेक्ट्रम २०२५’ यशस्वी

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
नागपूर ,
Karmannai School of Excellence कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्स येथे स्पेक्ट्रम २०२५ अंतर्गत आंतरशालेय विज्ञान कार्यरत मॉडेल व कला-साहित्य प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले. प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, नवोन्मेष व अनुभवाधारित शिक्षणाचे व्यासपीठ मिळाल्याचे सांगितले.
 
 
unni
 
 
पहिल्या दिवशी विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कार्यरत मॉडेल्स सादर केली.विज्ञान प्रदर्शन – पारितोषिक विजेते  Karmannai School of Excellence वर्ग अ- प्रथम भवन्स स्कूल,आष्टी द्वितीय – नारायणा विद्यालयम्, कोराडी; तृतीय – भवन्स स्कूल, आष्टी. वर्ग ब ,प्रथम – भवन्स स्कूल, आष्टी; द्वितीय – डिव्हाईन प्रोव्हिडन्स स्कूल, बुटीबोरी; तृतीय – बालाजी कॉन्व्हेंट, बुटीबोरी.
 
दुसऱ्या दिवशी स्टीम शिक्षणांतर्गत कला व साहित्य विषयांवरील सादरीकरणे झाली.प्रदर्शनाचा समारोप सत्कार समारंभाने झाला. विजेते व सहभागी विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.Karmannai School of Excellence या उपक्रमामुळे अनुभवाधारित व भविष्यासाठी सज्ज शिक्षणाबाबत शाळेची कटिबद्धता अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे समन्वयन स्मिता,वानखेडे, वैजयंती, शेंडे,ठाकरे आणि तपासे यांनी केले.
सौजन्य :उन्नती दातार,संपर्क मित्र